वियालीं परी न मोडे । दोघुलेंपण ॥६॥
जगाच्या एवढे
बालक होवून
जाईना मोडून
दोन पण ॥15॥
वियोग वैगुण्य
तयांच्या प्रेमीं न
कधीही घडून
येत असे ॥16॥
आपुलिये आंगीं संसारा । देखिलिया
चराचरा ।
परि नेदितीच तिसरा । झोंक लागों ॥७॥
तया अंगी जरी
घडतो संसार
सारे चराचर
अंकुरते ॥17॥
तिसरे पणाची
तया ना झुळूक
असे हे कौतुक
दिसू येते ॥18॥
जयां एका सत्तेचें बैसणें । दोघां येका
प्रकाशाचें लेणें ।
जें आनादि एकपणें । नांदती दोघें ॥८॥
एकाच सत्तेचे
तयाला आसन
एकच ते लेण
प्रकाशाचे ॥19॥
ऐसी ही अनादी
एकत्र नांदती
दोन म्हणवती
जरी इथे ॥20॥
भेदु लाजोनि आवडीं । एकरसीं देत बुडी ।
तो भोगणया थाव काढी । द्वैताचा जेथ ॥९॥
दोघात शिरण्या
पाही भेद भाव
परि अटकाव
होतो तया ॥21॥
मग तो लाजून
होय एकरूप
आपले स्वरूप
विलोपून ॥22॥
देवें संपूर्ण देवी । तियेविण कांहिंना
त गोसावी ।
किंबहुना एकोपजीवी । एकमेकां ॥१०॥
देवाने पूर्णत्व
येतसे देवीला
अर्थ ना देवाला
देवीविना ॥23॥
अशी ही जोडी
पुरुष प्रकृती
एकमेका देती
पूर्णत्वची ॥24 ॥
No comments:
Post a Comment