जे स्वामिचिया सत्ता । वीण असों नेणें
पतिव्रता ।
जियेविण सर्व कर्ता । कांहींच ना जो
॥२१॥
पतीव्रते तिये
सदा स्वामीसत्ता
जाईना अन्यथा
कुठेही ती ॥४४ ॥
आणिक स्वामीला
तियेविन नाही
कर्तृत्व ते काही
इये जगी ॥४५ ॥
जे कीं भर्ताराचें दिसणें । भर्तार जियेचें असणें
।
नेणिजती दोघें जणें । निवडूं जियें ॥२२॥
शक्तीचे अस्तित्व
असे शिवावर
तिजला आधार
सर्वथा तो ॥ ४६॥
प्रकृती पुरुष
एक एकाधीन
करणे विभिन्न
शक्य नाही ॥४७ ॥
गोडी आणि गुळु । कापूर आणि परिमळु ।
निवडू जातां पांगूळु । निवाड होये ॥२३॥
गुळआणि गोडी
कापूर सुगंधा
वेगळे करता
येत नाही ॥४८ ॥
निवडणे तिथे
होते पूर्ण व्यर्थ
असे एकवट
दोघे जण ॥४९ ॥
समग्र दीप्ती घेतां । जेविं दीपचि ये हाता ।
तेविं जियेचिया तत्त्वतां । शिवचि लाभे ॥२४॥
दीप्ती घेऊ जाता
दीप येतो हाता
ऐसी समग्रता
येथे असे ॥५० ॥
तैसे येथे शक्ती
शोधता तत्त्वता
शिव येई हाता
सवे तिच्या ॥५१ ॥
जैसा सूर्य मिरवे प्रभा । प्रभे सूर्यचि गाभा ।
तेविं भेद गिळीत शोभा । एकीच जे ॥२५॥
सूर्य मिरवतो
प्रकाशाची आभा
प्रकाशात गाभा
सूर्याचाच ॥५२ ॥
सूर्य प्रकाशात
भेद नाही जैसा
शिवशक्ती तैसा
न्याय असे ॥ ५३॥
कां बिंब प्रतिबिंबा द्योतक ।
प्रतिबिंब बिंबा अनुमापक ।
तैसें द्वैतमिसें येक । बरवतसे
॥२६॥
प्रतिबिंब असे
बिंबास कारक
बिंबास द्योतक
प्रतिबिंब ॥ ५४॥
प्रकृती पुरुषी
तैसे द्वैत मिषे
दोन भासतसे
एक चि जे ॥ ५५॥
सर्व शून्याचा निष्कर्षु । तो
जिया बाइला केला पुरुषु ।
जेणें दादुलेन सत्ताविशेषु ।
शक्ति जाली ॥२७॥
सर्वही शून्याचा
असे जो निष्कर्षू
परम परेशू
सत्ताधीश ॥ ५६॥
जियेने घेतला
करून दादला
मिळाली तियेला
त्याची शक्ती ॥ ५७॥
जिये प्राणेश्वरीवीण । शिवींही
शिवपण ।
थारों न शके ते आपण । शिवें
घडिली ॥२८॥
असे प्राणेश्वरी
शिवा जियेविन
नसे शिवपण
असे होय ॥ ५८॥
म्हणून जणू की
शिवे घडविली
धारण हि केली
अंगामध्ये ॥ ५९॥
ऐश्वर्यैसीं ईश्वरा । जियेचें
आंग संसारा ।
आपलाही उभारा । आपणचि जे ॥२९॥
ईश्वरा ऐश्वर्य
दिधले तियेन
संसारा देऊन
आकार या ॥ ६१॥
आपुलिये अंगा
रचिला पसारा
घेऊन उभारा
स्वयं येथे॥ ६२॥
पतीचेनि अरूपपणें । लाजोनि
आंगाचें मिरवणें ।
केलें जगायेवढें लेणें ।
नामरूपाचें ॥३०॥
अरूप आपुल्या
पतीला पाहून
गेली ती लाजून
सहजीच॥ ६३॥
म्हणूनया मग
केले मिरवणे
विश्वाचे हे लेणे
अंगावरी॥ ६४॥
******
जेथें ऐक्याचा दुकाळा । तेथें बहुपणाचा सोहळा ।
जियें सदैवेंचिया लीळा । दाखविला ॥३१॥
एकलेपणाच्या
सारून दुष्काळा
अनंत सोहळा
मिरविला ॥65 ॥
सुदैवपणाच्या
दाऊनिया लीला
आणीले रूपाला
जगता या ॥66 ॥
आंगाचिया आटणीया । कांत उवाया आणिया जिया ।
स्वसंकोचें प्रिया । रूढविली जेणें ॥३२॥
कष्टवून अंगा
शक्तीने शिवाला
बळाचा दिधला
आधार की.॥67 ॥
मग त्या शिवाने
स्वयें संकोचून
प्रिये मोठेपण
जगी दिले ॥68 ॥
जियेंते पहावयाचिया लोभा । चढे द्रष्टृत्वाचिया क्षोभा ।
जियेतें देखत उभा । आंगचि सांडी ॥३३॥
तिला पाहण्याचा
लोभधरी मना
दृष्टत्वाची धारणा
धरे तोही॥69 ॥
असे अंगभूत
सदा ती तयात
म्हणूनी दिसत
नाही कधी॥70 ॥
कांतेचिया भिडा । आवरला होय जगायेवढा ।
आंगवला उघडा । जियेवीण ॥३४॥
कांतेच्या भिडे
पती जग होय
नटूनिया जाय
विविधसा॥71 ॥
परि तिये विन
अंगा हरवून
उपाधी हरून
नाही होय॥72 ॥
जो हा ठाववेर्ही मंदरूपें । उवायिलेपणें हारपे ।
तो जाला जियेचेनि पडपें । विश्वरूप ॥३५॥
नसता ते दृश्य
दृष्ठत्व विरत
जाई हरवत
पुन्हा शुन्यी ॥73 ॥
असा हा जो सूक्ष्म
विस्तारे हरपे
होय विश्व रुपे
जियेमुळे ॥74 ॥
जिया चेवविला शिउ । वेद्याचे वोदनें
बहु ।
वाढितोनिशिं जेऊं । धाला जो ॥३६॥
तिने
शिवाला
जागृत
करून
दिधले
भोजन
वेद्य
असे ॥75 ॥
धाला
मग तो ही
करून
भक्षण
ती
वाढणारीन
भोजा
सवे ॥76 ॥
निदेलेनि भ्रतारें । जे विये चराचरें ।
जियेचा विसांवला नुरे । आंबुलेपणही
॥३७॥
निजता भ्रतार
विये चराचर
असा व्यवहार
जिचा जगी ॥77 ॥
विसावता पण
तिचे कर्तेपण
नवरे पण
नुरे काही ॥78 ॥
जंव कांत लपों बैसे । तंव नेणवे
जियेच्या उद्दिशें ।
जियें दोघें आरसे । जियां दोघां ॥३८॥
प्रकृती
दोषे न
पुरुष
कळो ये
कुण्याही
उपाये
आच्छादिला ॥79
॥
परी
पाहता ते
आरसेच
दोन
राही
प्रकाशून
एकमेका ॥80
॥
जियेचनि आंगलगें । आनंद आपणापें आरोगूं
लागे ।
सर्वभोक्ता परी नेघे । जियेविण कांहीं
॥३९॥
आणि तो पुरुष
तिये अंगे संगे
आनंदाची भोगे
आपुलाची ॥81
॥
अन् तिच्या वीन
भोक्तृत्व ही काही
कदापि न घेई
कधी काळी ॥82
॥
जया प्रियाचें जें आंग । जो प्रिय
जियेचें चांग ।
कालउनी दोन्ही भाग । जिवितें आहाति
॥४०॥
पुरुषा
प्रकृती
गमे
स्वयें अंग
तिलाही
ते चांग
त्याचे
बल ॥83
॥
कालवून
दोघे
असे
एका भागी
जेवणाचे
भोगी
जणू
सुख ॥84 ॥
ओवी
क्रमांक 41 ते 45
जैसि कां समिरेंसकट गति । कां सोनियासकट कांति ।
तैसे शिवेसिं शक्ति । अवघिचि जे ॥ १-४१ ॥
वायू
सवे गती
सोन्यासवे कांती
शिवास ती शक्ती
तैसी
असे ॥ 85॥
कां कस्तुरीसकट परिमळु । कां उष्मेसकट अनळु ।
तैसा शक्तींसिं केवळु । शिवुचि जो ॥
१-४२ ॥
अग्नीत
तो ताप
कस्तुरीस
गंध
शिवशक्ती
संघ
तैसा असे ॥ 86॥
राति आणि दिवो । पातलीं सूर्याचा ठावो ।
तैसीं आपुला साचि वावो । दोघेंही
जियें ॥ १-४३ ॥
रात्र
अन् दिस
गेली
सूर्या पाहो
आपुला
तो ठावो
हरवली॥ 87॥
तैसी
परब्रह्मी
शिव
आणि शक्ती
हरवून
जाती
पूर्णपणे॥ 88॥
किंबहुना तियें । प्रणवाक्षरीं विरुढातियें ।
दशेचीही वैरियें । शिवुशक्ति ॥ १-४४
॥
जगत उत्पन्न
प्रवणा
मधून
विस्तार
येथुन
सृष्टीचा
या॥ 89॥
तयाला
गिळती
शिव
अन् शक्ती
वैरी
ही असती
सकळाची॥ 90॥
हें असो नामरूपाचा भेदसिरा । गिळीत येकार्थाचा उजिरा ।
नमो त्या शिववोहरा । ज्ञानदेवु
म्हणे ॥ १-४५ ॥
असो, नामरूपाचा
असे
भेद शिरा
भक्षुनि
तो सारा
उरे
तत्त्व॥ 91॥
त्यास
जी दाविती
शिवशक्ती
दंपती
वंदे
तया प्रति
ज्ञानदेव॥ 92॥
जया दोघांच्या आलिंगनीं । विरोनि गेली दोन्ही ।
आघवियाचि रजनी । दिठिचि जे ॥
१-४६ ॥
तया दोघांच्या
या
दृढ
अलिंगन
दोघेही
विरून
नाही
होती॥ 93॥
जैसी
की रजनी
विलया जावूनी
स्वरूपी
राहूनी
अंतर्दृष्टी॥ 94॥
जयांच्या रूपनिर्धारीं । गेली परेसीं वैखरी ।
सिंधूसीं प्रळयनिरीं । गंगा जैशी
॥ १-४७ ॥
चारीही
त्या वाचा
जयाच्या
रूपात
जाती
हरपत
निर्धारता॥ 95॥
सिंधू
सवे गंगा प्
रलयार्णावात
जाय
हरवत
तैसा
रीती॥ 96॥
वायु चळबळेंशीं जिराला व्योमाचिये कुशीं ।
आटला प्रळयप्रकाशीं । सप्रभ भानु
॥ १-४८ ॥
वायूच्या
लहरी
वायूच्या
सवेत
आकाश
कुशीत
हरवती॥ 97॥
अन्
प्रभाकर
प्रलय
तेजात
प्रभेचा
सेवेत
आटू
जातो॥ 98॥
तेवीं निहाळितां ययांते । गेले पाहणेंनसीं पाहतें ।
पुढती घरौतेंवरौतें । वंदिलीं
तियें ॥ १-४९ ॥
तैसे
न्याहाळीता
यया
एक घेता
पाहणे पाहता
हरवतो॥ 99॥
ऐसे
अंतर्बाह्य
असती
जे व्याप्त
नमु
तया प्रत
पूर्णपणे ॥ 100॥
जयांच्या वाहाणी । वेदकु
वेद्याचें पाणी ।
न पिये पण सांडणी । आंगाचि करी ॥
१-५० ॥
तया जाणण्या
जाणता
जाणणे
होऊनिया
उणे
लया जाई॥ 101॥
प्राप्तर्थाचे
पाणी
प्याल्याविन कोणी
अंगाची
सांडणी
जेवी
करी॥ 102॥
तेथ मी नमस्करा । लागीं उरों दुसरा ।
त-ही लिंगभेद पहा । जोडूं जावों ॥ १-५१ ॥
आणिक
येथे मी
करू
नमस्कारा
म्हणता दुसरा
होऊ
जाय ॥ 103॥
एकत्व
सांडून
प्रमाद
करून
कैसी
ये घडून
वंदना
ती ॥ 104॥
परि सोनेंनसिं दुजें । नव्हतु लेणें सोना भजे ।
हें नमन करणें माझें । तैसें आहे ॥ १-५२ ॥
सोन्याहून जैसे
लेणे
नव्हे भिन्न
तैसे
हे नमन
माझे
येथे॥ 105॥
सांगतां वाचेतें वाचा । ठाउ वाच्य वाचकाचा ।
पडतां काय भेदाचा ।
विटाळु होये ? ॥ १-५३ ॥
वाणीने उच्चार
वाणी
या शब्दांचा
दिसतो भेदाचा
विटाळची॥ 106॥
शब्दात
हि वाणी
वाणीतही वाणी
भेदाची
कहाणी
नाही
तिथे॥ 107॥
सिंधु आणि गंगेचि मिळणी । स्त्रीपुरुष नामाची मिरवणी ।
दिसतसे तरी काय पाणी ।
द्वैत होईल ? ॥ १-५४ ॥
सिंधूनी
गंगेचा
संगम
हा झाला
पाणीच
पाण्याला
मिळाले
ते ॥ 108॥
गंगा
सिंधू नाम
स्त्री
पुरुष वाचक
पाण्याला
बांधक
होतं
नाही॥ 109॥
पाहे पां भास्य भासकता । आपुला ठाईं दावितां ।
एकपण काय सविता । मोडितसे ? ॥ १-५५ ॥
सूर्याच्या
प्रकाशी
सूर्याचे
दर्शन
दिसे
द्वैतपण
उजेडाचे ॥ 110 ॥
भास
भासकता
ययाची
एकता
पाहता
तत्त्वता
कळू
येते॥ 111॥
चांदाचिया दोंदावरी । होत चांदणियाची विखुरी ।
काई उणें दीप्तीवरी ।
गिवसों पां दीपु ॥ १-५६ ॥
चंद्र
बिंबावर
चंद्राचा
प्रकाश
भेदाचा
आभास
तिथे
नसे ॥ 112॥
दीपा
विना दीप्ती
घेण्यास
जी जाती
येई
तया हाती
दीपाची
तो ॥ 113॥
मोतियाची किळ । होय मोतियावरी पांगुळ ।
आगळें निर्मळ । रूपा
येकीं ? ॥ १-५७ ॥
मोतीयाचे
तेज
मोतीयाचे
रंगी
मोतीपणा
अंगी
शोभतसे ॥ 114॥
मात्राचिया त्रिपुटिया । प्रणवु काइ केला चिरटिया ? ।
कीं 'णकार' तिरेघटिया । भेदवला काई ? ॥ १-५८ ॥
ओंकारी
मात्रेचा
असते
त्रिपुटी
त्यास
का म्हणती
तुकडे
ते ॥ 115॥
ण कार
शब्दाला
तीन
रेषा थेट
म्हणून
का भेद
होतो
काय॥ 116॥
अहो ऐक्याचें मुद्दल न ढळे । आणि साजिरेपणाचा लाभु मिळे ।
तरि स्वतरंगाचीं मुकुळें
। तुरंबु का पाणी ॥ १-५९ ॥
एकत्वाला
धक्का
नच
की लागता
लाभे
सुंदरता
का
न घ्यावी ॥ 117॥
पाण्यावरी
फुल
तरंगाची
व्हावी
का
न ती हुंगावी
पाणीयानी ॥ 118॥
म्हणौनि भूतेशु अणि भवानी । वंदिली न करूनि सिनानि ।
मी रिघालों नमनीं । तें
हें ऐसें ॥ १-६० ॥
म्हणून
भुतेश
आणिक
भवानी
एकच
मानूनी
पाहियली ॥ 119॥
तयात
न भेद
एक
पणी एक
अभिन्न
मी होत
जाणयली ॥ 120॥
दर्पणाचेनि त्यागें । प्रतिबिंब बिंबीं रिगे ।
कां बुडी दिजे तरंगें । वायूचा ठेला ॥ १-६१॥
बिंब
प्रतिबिंबि
राहते
येऊन
त्यागिता
दर्पण
आपोआप ॥ 121॥
थांबताच
वायु
लहरी
नर्तन
होतात
विलीन
पाणीयात ॥ 122॥
नातरी नीदजातखेवों । पावे आपुला ठावो ।
तैशी बुद्धित्यागें देवीदेवो । वंदिली मिया ॥ १-६२ ॥
सरताच
नीद
आपुलाच
ठाव
कळू
येई भाव
आपुल्यात ॥ 123॥
तैसा
बुद्धी त्याग्ये
उपाधी
सरता
जहालो
वंदिता
देवी
देव ॥ 124॥
सांडूनि मीठपणाचा लोभु । मीठें सिंधुत्वाचा घेतला लाभु ।
तेविं अहं देऊनि शंभु । शांभवी झालों ॥ १-६३ ॥
सांडूनिया
मीठ
पणाचा
तो लोभ
घेतला
हा लाभ
सिद्धत्वाचा ॥ 125॥
असे
इथे केले
अहं
म्या त्यागिले
स्वरूप
पातले
शिव
शक्ती ॥ 126॥
शिवशक्तिसमावेशें । नमन केलें म्यां ऐसें ।
रंभागर्भ आकाशें । रिगाला जैसा । १-६४ ॥
शिवशक्ती
मध्ये
पूर्ण
सामावलो
एकरूप
झालो
नमोनिया ॥ 127॥
केळी
रोपट्याने
सर्वस्व
त्यागिले
आकाश
ते झाले
रिघोनिया॥ 128॥
******
॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्अमृतानुभवे
शिवशक्तिसमावेशनं नाम प्रथम प्रकरणं संपूर्णम् ॥