Thursday, 5 December 2019

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय २ सद्गुरू स्तवन ओव्या 16ते 20 पर्यन्त





  



जयाचेनि सावायें । जीवु ब्रह्म उपर लाहे ।  
ब्रह्म तृणातळीं जाये । उदासे जेणें ॥ २-१६ ॥  
 

जयाची साहाये
जीव ब्रह्म होये
लंघूनिया जाये
गुरुत्व ही   ३७

होता जो उदास
ब्रह्मत्व लयास
जाऊन ये त्यास
तृण मूल्य  ३८


उअपस्तिवरि राबतिया । उपाय फळीं येती मोडोनियां ।  
वरिवंडले जयाचिया । अनुज्ञा कां ॥ २-१७ ॥

 
तयाच्या आज्ञेने
शिणले अपार
सुदैव साकार
होत असे  ३९

जीव कुरवंडी
करण्या तयार
त्यास येथ फळ
लाभतसे  ४०

जयाचा दिठिवावसंतु । जंव न रिघे निगमवनाआंतु ।  
तंव आपुलिये फळीं हातु । न घेपतिही ॥ २-१८ ॥  

ज्याच्या दृष्टीचा
सुखद वसंत
निगम वनात
रिघेना तै   ४१  

फळं आपुलेच
परंतु ते हाता
न येतसे घेता
काही केल्या  ४२

 

पुढें दृष्टीचेनि आलगें । खोंचि कीं निवटी मागें ।  
येव्हडिया जैता नेघे । आपणपें जो ॥ २-१९ ॥
ऐसी दिठी असे
निराळी तयाची
परतत्त्व खोची
निवटूनी  ४३

उपाधी निराश
स्वरूपी आरास
ऐसा त्याशिष्यास
लाभ घडे . ४४

मिळवून यश
असे हे थोरले
त्यांनी मिरवले
नाही कुठे  ४५


लघुत्वाचेनि मुद्दलें । बैसला गुरुत्वाचे शेले । 
 नासूनि नाथिलें । सदैव जो ॥ २-२० ॥     

लघुत्वा परोक्ष
गुरुत्व न त्यास
अवघे आभास
लघु गुरू  ४६

व्यापून जगात
असे अवकाश
लघुत्व ते त्यास
कैसे मग  ४७
***********************************

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...