Wednesday 11 December 2019

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय २ सद्गुरू स्तवन ओव्या २१ ते२५ पर्यन्त




 अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय २ सद्गुरू स्तवन ओव्या २१ ते२५    पर्यन्त

२१

नाहीं जे जळीं बुडिले । तै घनवटें जेणें तरिजे ।  
जेणें तरलियाहि नुरिजे । कवणिये ठाईं ॥ २-२१ ॥ 

नाही त्या पाण्यात
कुणी जो बुडाला
तारीला तयाला
यया नौके  ४८

मग तो वेगळा
मुळी ना उरतो
समरस होतो
तया सवे  ४९
 22

आकाश हे सावेव । न बंधे आकाशाची हांव ।  
ऐसें कोण्ही येक भरीव । आकाश जो ॥ २-२२ ॥  


जणू ते आकाश
असे सावयव
परी नाही हाव
होण्याची ती  ५०


जाई चिदाकाश
महद आकाशी
त्यांची उखी पुखी  ( विचार पुस )
कोण करें  ५१ 

 23 

चंद्रादि सुसीतळें । घडलीं जयाचेनि मेळें ।  
सूर्य जयाचेनि उजाळें । कडवसोनि ॥ २-२३ ॥ 

तयाचिया कृपा
कवडसे घडे
चंद्र शितलते
प्राप्त होय  ५२

आणि तो आदित्य
तेजाचे भांडार
होऊन साचार
ठाके उभा  ५३

२४


जीवपणाचेनि त्रासें । यावया आपुलिये दशे ।  
शिवही मुहूर्त पुसे । जया जोशियातें ॥ २-२४ ॥  

जीवपणी त्रास
सोसता शिणला
उत्कंठा शिवाला
स्वरूपाची  ५४

यावया त्या दशे
मुहूर्त तो पुसे
सद्गुरू ज्योतिष्ये
आदराने  ५५

25 
चांदिणें स्वप्रकाशाचें । लेइला द्वैतदुणीचें ।  
तर्ही उघडेपण नवचे । चांदाचें जया ॥ २-२५ ॥

लेवून वसने
स्वयंप्रकाशाची
प्रभा चंद्रम्याची
खुंटे  चि ना  ५६

तैसा सद्गुरु
होऊ न कृपाळू
कृपा आळू माळू
वचे चि ना  ५७ 


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com/

 *************

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...