Tuesday, 3 December 2019

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय २ सद्गुरू स्तवन ओव्या ११ ते १५ पर्यन्त




अमृतानुभव गुरुस्तवन ओवी ११ पासून पुढे १५  पर्यन्त
११


जयाचेनि कृपासलिलें । जीउ हा ठाववरी पाखाळे ।  
जें शिवपणहि वोंविळें । अंगी न लवी ॥ २-११ ॥

कृपेच्या सलिली
जीव हो सोवळा
शिवास ओवळा
म्हणून लागे॥ २६॥

सामर्थ्य कृपेचे
असे इतके हे
पावित्र प्रवाहे
अंगो पांगी    २७

१२
 राखों जातां शिष्यातें । गुरुपणहि धाडिलें थितें । 
 तर्ही गुरुगौरव जयातें । सांडीचिना ॥ २-१२ ॥

रक्षिता शिष्यास
त्यांनी आपुले
गुरुत्व सांडले
सहजची  २८

परि ते असते
अच्युत अटळ .
व्यापून सकळ
चराचर   २९

१३
एकपण नव्हे सुसास । म्हणोन गुरु-शिष्यांचें करोनि मिस ।  
पाहणेंचि आपली वास । पाहतसे ॥ २-१३ ॥

एकत्वी मागावे
सुख ते कुणास
कैसे नि कुणास
सुखवावे   ३०

म्हणूनी शिष्यांचे
करुनिया मिष
आप आपणास
पाहे गुरू ३१
 14
 जयाचेनि कृपातुषारें । परतलें अविद्येचें मोहिरें ।  
परिणमे अपारें । बोधामृतें ॥ २-१४ ॥
जयाच्या कृपेच्या
शीतल तुषारे
अनळही हारे
अज्ञानाचा   ३२

जणू बोधामृत
पवित्र अपार
होवून साकार
परिणमे  ३३


 15
 वेद्या देतां मिठी । वेदकुहि सुये पोटीं ।  
तर्ही नव्हेचि उशिटी । दिठी जयाची ॥ २-१५ ॥
पवित्रक वेद्य
असे सद्गुरू
ज्याचा आकारू
नसे ज्ञेय  ३४

तया पाहू जाता
हरवे पाहता
जणू तया पोटा
विरोनियां  ३५

परि कृपा दृष्टी
होत  ना मलीन
द्वैती उतरून
वेगळाली  ३६

 **************************

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...