अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय २ सद्गुरू स्तवन ओव्या ४१ ते ४५ पर्यन्त
राति नुरेचि सूर्या । नातरी लवण पाणिया ।
नुरेचि जेवी चेइलिया । नीद जैसी ॥ २-४१ ॥
४१
सूर्य देव येता
रात्र जाते लया
लवण पाणिया
हरवते॥९४॥
जागे झाल्यावर
नुरेचि ती निद्रा
घडते सर्वदा
असे इथे॥९५॥
४२
कापुराचे थळीव । नुरेचि आगीची बरव ।
नुरेचि रूप नांव । तैसें यया ॥ २-४२ ॥
कापूर दागिने
बरवे साजरे
हारपती सारे
अग्नी माजि॥९६॥
नुरे नावरूप
ऐसे शिष्या घडे
भेदभाव मोडे
गुरू पुढे॥९७॥
४३
याच्या हातांपायां पडे । तरी वंद्यत्वें पुढें न मंडे ।
न पडेचि हा भिडे । भेदाचिये ॥ २-४३ ॥
जरी कधी यांच्या
पडे हातापाया
जातसे वंदाया
प्रेमभावे॥९८॥
तरी ते न घेती
भिडे न पडती
द्वैतां न येती
का ही केल्या॥९९
४४
आपणाप्रति रवी । उदो न करी जेवीं ।
हावंद्य नव्हें तेवीं । वंदनासी ॥ २-४४ ॥
काय रवी कधी
आपणाला साठी
येतो उदयाती
पुर्वांचली ॥१००॥
तैसे वद्य जरी
सद्गुरु मूर्ती
वंदना प्रती
कुठल्याही॥१०१॥
४५
कां समोरपण आपलें । न लाहिजे कांहीं केलें ।
तैसें वंद्यत्व घातलें । हारौनि येणें ॥ २-४५ ॥
आपण आपल्या
राहून समोर
भेटीची मोहर
उमटेना॥१०२॥
तैसे ते वंद्यत्वी
नाहीच उरले
जगी सामावले
साऱ्या रुपी॥१०३॥
...........
विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
No comments:
Post a Comment