अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५ सच्चिदानंद पदत्रय
विवरण ओव्या २१ ते२५(अभंग ४४ ते५३ )
*******************************************************************************************************
ते वेळीं वरिसोनि मेघु । समुद्र होउनि वोघु । सरे दाऊनि मागु । राहे जैसा ॥ ५-२१
21.
बरसून मेघ
होय जलौघ
सागरात बघ
हरवे तो ॥४४ ॥
हरवलेली वस्तू
सापडून जाता
माग तो तत्वतः
थांबू जातो ॥४५ ॥
॥ फळ विऊनि फुल सुके । फळनाशे
रस पाके । तोहि रस उपखें । तृप्तिदानीं
॥ ५-२२
धरताच फळ
फुल ते सुकते
फळही सरते
रसपाकी
॥४६॥
आणिक ते रस
देऊनिया तृप्ती
सरूनीया अंती
जाती मग ॥४७ ॥
॥ कां आहुति अग्नीआंतु । घालूनि
वोसरे हातु । सुख चेवऊनि गीतु । उगा राहे ॥
५-२३ ॥
अग्नीत आहूती
देउनिया हात
माघारी फिरत
येई जैसा ॥४८ ॥
श्रवणाचे सुख
मनी उठवून
गीत ते संपून
जाई जैसे ॥४९ ॥
नाना मुखा मुख दाऊनी । आरिसा जाय निगोनि । कां निदैलें चेववुनी । चेववितें जैसें ॥ ५-२४ ॥
मुखाला तयाचे
रुप ते दावून
आरसा निघून
जाई कैसा ॥५०॥
का निजला कुणी
तया उठवूनी
उठविता कुणी
जाई जैसा ॥५१॥
तैसा सच्चिदानंदा चोखटा । दाऊनि द्रष्ट्या द्रष्टा । तिन्हीं पदें लागतीं वाटा । मौनाचिया ॥ ५-२५ ॥
तयापरी पदे
ही सच्चिदानंद
दाऊनी यथार्थ
रूप दृष्या॥५२॥
होताच हे काम
जाती मावळून
होऊनिया मौन
वाटे परी ॥५३॥
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
५/६/२०२०fb 6/2
खूपच सुरेख
ReplyDeleteखूपच सुरेख
ReplyDeleteखूपच सुरेख
ReplyDelete