अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५ सच्चिदानंद पदत्रय विवरण ओव्या ११ ते १५ (अभंग२४ ते३२ )
*************************************************************************
दुःखाचेनि सर्वनाशें । उरलें तें सुख ऐसें ।
निगदिलें निश्वासें । प्रभूचेनि ॥ ५-११ ॥
तैसाची दुःखाचा
करण्या विनाश
प्रभूचा विश्वास
सुख बोले ॥२४॥
[ प्रभूच्या श्वासात
वेदा ची उत्पत्ती
म्हणून तयाती
नावं ऐसे ] ॥२५॥
ऐसीं सदादि प्रतियोगियें । असदादि तिन्ही इयें ।
लोटितां जाली त्राये । सत्तादिकां ॥ ५-१२ ॥
ऐशिया रीतीने
असदाशी तीन
सद ऐसे तीन
योजुनिया ॥२६॥
सद असदा चा
घेऊनिया ग्रास
होऊन लयास
स्वयम् गेले. ॥२७॥
एवं सच्चिदानंदु । आत्मा हा
ऐसा शब्दु ।
अनन्यावृत्ति सिद्धु । वाचक नव्हे ॥
तयापरी वेद
उच्चारला शब्द
सचिदानंद
आत्मा ऐसा ॥२८॥
राहेना निराळा
परब्रह्माहून
जातसे विलिन
होऊनिया ॥२९॥
तेणें तो गिंवसें । सूर्यु कयी ? ॥ ५-१४ ॥
सूर्याच्या प्रकाशे
जड हे आभासे
जडा त्या गवसे
सूर्य काय ? ॥३०॥
ते वाचा प्रकाशिजे । हें कें आहे ? ॥ ५-१५ ॥
तयापरी जया
केवळ तेजाने
वाचेसी वचने
सुचतात ॥३१॥
काय ती हे वाणी
तयाचे ते ज्ञान
देईल करून
कधीकाळी. ॥३२॥
************************
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
No comments:
Post a Comment