Saturday, 16 May 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५ सच्चिदानंद पदत्रय विवरण ओव्या ४६ ते५० (अभंग९५ ते १०१ )





अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५ सच्चिदानंद पदत्रय विवरण  ओव्या ४६   ते५० (अभंग९५ ते १०१  )


रूप नाहीं तैं लावण्य । अंग नुठी तैं तारुण्य । 
 क्रिया न फुटे तैं पुण्य । कैसें असे ॥ ५-४६ ॥  

रूप नाही तरी
म्हणावे लावण्य
देहास तारुण्य
नसलेल्या ॥ ९५॥  


अथवा क्रियांनी
घडल्या वाचून
पुण्यदायी कोण
म्हणे तिला  ॥ ९६॥  

जैं मनाचा अंकूर नुपजे । तेथिलेनि मकरध्वजें ।  
तोचि हन माजे । तरीचि घडे ॥ ५-४७ ॥

मनाचा अंकुर
फुटल्या वाचून
काम तो येऊन
राही काय ॥ ९७॥  

कां वाद्यविशेषाची सृष्टी । जैं जन्म नेघे दृष्टी ।  
तैं नादु ऐशी गोष्टी । नादाचि जोगी ॥ ५-४८ ॥

जोवरी विविध
वाद्य वाजती
नादाची स्थिति
नादा ठाव ॥ ९८॥  

नाना काष्ठाचिया विटाळा । वोसरलिया अनळा ।  
लागणें तैं केवळा । अंगासीचि ॥ ५-४९ ॥

काष्टा चा संबंध
सोडीला अनला
तरीही उरला
स्वरूपाने ॥ ९९॥  

दर्पणाचेनि नियमें । वीणचि मुखप्रमे ।  
आणिती तेचि वर्में । वर्मती येणें ॥ ५-५०

आरशा वाचून
मुखाचे ज्ञान
येतसे घडून   
काय कोणा ॥ १००॥  

तयास कळले
इथले हे वर्म
गूढ गुह्यतम
पूर्ण पणे॥१०१ ॥  

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

***** ******************** 

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...