Friday 8 May 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५ सच्चिदानंद पदत्रय विवरण ओव्या ३१ ते३५ (अभंग ६४ ते७५ )





अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५  सच्चिदानंद पदत्रय विवरण  ओव्या ३१  ते३५ (अभंग ६४  ते७५  )

ऐसें यया सुखपणें । नाहीं दुःख कीर होणें । मा सुख हें गणणें । सुखासि काई ? ॥ ५-३१
३१


पण सुख हे
स्वरूप जयाचे
तयाला दुःखाचे
काय काम  ॥६४॥

ऐसिया सुखाला
सुख हे म्हणणे
निरर्थ बोलणे
सारे का ही॥६५॥

म्हणोनि सदसदत्वें गेलें । चिदचिदत्वें मावळलें ।
सुखासुख जालें । कांहीं ना कीं ॥ ५-३२ ॥

सत चित सुखा
विरोधी जे होते
जाहले चालते
येताची ते ॥६६॥

असत अचित
दु:खते तिसरे
नाहीच कळले
काही कुठे ॥६७॥

सतचीत सुखा
सरे प्रयोजन
गेले हरवून
म्हणूनिया ॥६८॥
आतां द्वंद्वाचें लवंचक । सांडूनि दुणीचे कंचुक । 
 सुखमात्रचि एक । स्वयें आथी ॥ ५-३३ ॥

मिथ्या भेदभाव
गेले हरवून
द्वैताचे फाटून
वस्त्र जेवी ॥६९॥

सरता अज्ञान
भेद तो नाशून 
राहते उरून
सुख मात्र ॥७०॥
३४
वरी एकपणें गणिजे । तें गणितेनसीं ये दुजें ।  
म्हणोनि हें न गणिजे । ऐसें एक ॥ ५-३४ ॥

मोजु जाता एक
गणिते दुसरा
येतोच  आकारा
द्वैतामध्ये ॥७१॥

म्हणूनिया  ऐसे
जे हे एकपण
घडेना मोजणं
काही केल्या ॥७॥
तैसें सुखा आतोनि निथणें । तें सुखीयें सुखी तेणें ।
हें सुखमात्रचि मा कोणें । अनुभवावें ? ॥ ५-३५ ॥  

सुखाच्या मधून
बाहेर पडून
मी सुखी म्हणून
होतो कोणी ॥७३॥

तिथे भोगणारा
न होत वेगळा
गुणात गुंतला
दिसतो ची ॥७४॥

ऐसे नव्हे येथे
सुखाची केवळ
स्वानंद निखळ
दुजेवीन. ॥७५॥


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
७/६/२०

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...