Saturday 9 May 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५ सच्चिदानंद पदत्रय विवरण ओव्या ३६ ते४० (अभंग ७६ ते ८४ )






अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५  सच्चिदानंद पदत्रय विवरण  ओव्या ३६  ते४० (अभंग ७७  ते ८४ )

जैं प्रकृति डंकु अनुकरे । तैं प्रकृति डंकें अवतरे ।
मां डंकूचि तैं भरे । कोणकोणा ? ॥ ५-३६ ॥
 .
प्रकृती पुरूषा
दंश तो करूनी
घेई नाचवून
जगात या ॥ ७६ ॥

असे दंश  फक्त
नसे दोघेजण
कोणा म्हणे कोण
काय झाले  ॥ ७७ ॥

तैसें आपुलेनि सुखपणें । नाहीं जया सुखावणें ।
आणि नाहीं हेंही जेणें । नेणिजे सुखें ॥ ५-३७ ॥

आपल्या सुखाने
जो न सुखावने 
सुख ते भोगणे 
घडेचिना ॥ ७८ ॥

सुखी न म्हणणे
ऐसे जे बोलणे  
तेथे उमटणे  
हेही नाही ॥ ७९॥

आरिसा न पाहतां मुख । स्वयें सन्मुख ना विन्मुख ।
तेवीं नसोनी सुखासुख । सुखचि जें ॥ ५-३८ ॥


पाहिल्या वाचूनी
आरश्यात  मुख
सन्मुख विमुख
दोन्ही नाही ॥ ८०॥


तयापरी तिथे
सुख-दुःखातित   
सुखची सतत
मूळ रुपी॥ ८१॥

सर्व सिद्धांताचिया उजरिया । सांडोनिया निदसुरिया ।
आपुलिया हात चोरिया । आपणचि जो ॥ ५-३९ ॥

सर्व सिद्धांतांच्या  
शोधतांना वाटा
न येईचि  हाता
जैसे काही ॥ ८2 ॥


तया शब्द ज्ञाना
पलीकडे काही
राहते ते राही
स्वरूप  ते ॥ ८३॥

न लवितां ऊंसु । तैं जैसेनि असे रसु ।
तेथिंचा मीठांशु । तोचि जाणे ॥ ५-४० ॥

न लावीता ऊस
जैसा असे रस
तेथील मिठास
तोचि जाणे. ॥ ८४


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...