Monday 13 April 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५ सच्चिदानंद पदत्रय विवरण ओव्या ६ ते १० (अभंग१२ ते२३ )





 अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५  सच्चिदानंद पदत्रय विवरण  ओव्या ६ ते १०  (अभंग१२  ते  ) 
 ************************************************************************



येर्हवीं सच्चिदानंदभेदें । चालिलीं तिन्ही पदें । 
परि तिन्हीं उणीं आनंदें । केलीं येणें ॥ ५-६ ॥  
 
6
इतर वेळेला 
सच्चिदानंद 
ऐसे तीन भेद 
भासतात १२

एक असे सत  
दुसरी ते चित्त 
आणिक आनंद 
तिसरी ते १३

परी तिन्ही केली 
येथे एकरूप 
आनंद स्वरूप 
परब्रह्म १४

सत्ताचि कीं सुख प्रकाशु । प्रकाशुचि सत्ता उल्हासु । 
हें न निवडे मिठांशु । अमृतीं जेवीं ॥ ५-७ ॥  
7
सत ची भासते 
चिदानंद रूप
अवघे स्वरूप 
होऊनिया१५

आणिक ते चित्त 
होऊनही सत 
असते नांदत 
एका ठाई १६

जसे की माधुर्य 
असे अमृतात 
एकरूप होत
सर्वकाळी१७


शुक्लपक्षींच्या सोळा । दिवसा वाढती कळा ।  
परि चंद्र मात्र सगळा । चंद्रीं जेवीं ॥ ५-८ ॥  
8
शुक्ल पक्षी जैसी 
चंद्रा वाढ होई  
कला नवलाई 
वृद्धिंगत १८

जरी चंद्र तोच 
असतो तेवढा 
छायेचा पडदा 
ओdनिया १९

थेंबीं पडतां उदक । थेंबीं धरूं ये लेख ।  
परि पडिला ठायीं उदक । वांचूनि आहे ? ॥ ५-९ ॥ 

9

थेंबोथेंबी पाणी 
पडतसे खाली 
गणिती जाहली 
नाही जशी ०॥

परी मोजू जाता 
अवघेच पाणी 
दुसरें न आणि 
काही तिथे 

 तैसें असताचिया व्यावृत्ती । सत् म्हणों आलें श्रुति ।   
जडाचिया समाप्ती । चिद्रूप ऐसें ॥ ५-१० ॥

10

तैसे ची असत 
निराकारणास 
सत्य या शब्दास 
योजी श्रुती

आणि जडाची 
करण्या समाप्ती 
चिद्रूप या शब्दी
योजी तीच
****


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
  https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...