Saturday, 11 April 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५ सच्चिदानंद पदत्रय विवरण ओव्या१ रे ५ (अभंग१ ते११ )





अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५  सच्चिदानंद पदत्रय विवरण  ओव्या१ रे ५ (अभंग१ ते११ )
 **********************************************************************

सच्चिदानंद पदत्रय विवरण
सत चित आनंद या तीन शब्दांचे विवरण
[ सत म्हणजे सत्ता ,चित म्हणजे, चैतन्य प्रकाश; आनंद म्हणजे सुख या अर्थाने हे शब्द या अध्यायात येत आहेत.]
 
सत्ता प्रकाश सुख । या तिहीं तीं उणे लेख ।  
जैसें विखपणेंचि विख । विखा नाहीं ॥ ५-१ ॥ 

1
सत् चित् आनंद 
असे अंतर्भूत 
परमात्म तत्त्वात 
सर्वकाळी  ॥०१॥

सच्चिदानंद ही
वेगळी भासती 
एकच असती 
परी पहा  ॥०

या तिन्ही विरोधी 
जड तम दुःख 
तयाला व्यावृत्त 
करुनिया  ॥०

जैसे विषा नाही 
विषाचे संकट 
तयाच्या सकट 
तेची होय  ॥०


कांति काठिण्य कनक । तिन्ही मिळोनि कनक एक ।  
द्राव गोडी पीयुख । पीयुखचि जेवीं ॥ ५-२ ॥  

2

कांती कठिणता 
सोनेरी झळाळ 
सुवर्ण सकळ 
 व्यापुनीया  ॥०

द्रव्यता माधुर्य 
शुभ्रता वर्णही 
शोभुनी या राही 
दुधामध्ये  ॥०


उजाळ दृति मार्दव । या तिन्हीं तिहीं उणीव ।  
हें देखिजे सावेव । कापुरीं एकीं ॥ ५-३ ॥  

3
उजाळ सुगंध 
मार्दव व अंतरी 
वसती कापुरी 
सावेवची  ॥०

तसेच उणीव 
दुर्गंध मालिन्य 
आणिक काठिण्य 
यांची असे   ॥०


आंगें कीर उजाळ । कीं उजाळ तोचि मवाळ ।  
कीं दोन्ही ना परिमळ । मात्र जें ॥ ५-४ ॥ 

4

अंगाने उजळ 
सवेची मवाळ
देतो परिमळ 
कापुरची  ०९

 ऐसें एके कापुरपणीं । तिन्ही इये तिन्ही उणी ।   
इयापरी आटणी । सत्तादिकांची ॥ ५-५

5

ऐसा तो कापूर 
तिन अवग़ुण 
टाकतो पुसून 
एकपणी ॥१०॥

तैसेचि हे तत्व 
करी तसे अंत 
सत्तेचा समस्त 
एकटेच ॥११॥



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

  https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...