Thursday, 2 April 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ४ ञानाज्ञानभेदकथन ओव्या ३६ रे४० (अभंग६७ ते ७५ )



अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ४  ञानाज्ञानभेदकथन ओव्या ३६ रे४० (अभंग६७ ते ७५   ) 

***********************************************************************


कां काळा राहे काळवखा । तो आपणया ना आणिका ।
न चोजवे तही आसिका । हा मी बाणे ॥ ४-३६ ॥
 
३६
 काळासा माणूस 
काळोखी भेटला 
जरी न दिसला 
तरी असे ६७

मी आहे त्याचे हे 
असणारे ज्ञान 
जात न सोडून 
कधी तया  ६८

तैसे असणें कां नसणें । हें कांहींच मानुसवाणें ।
नसोनि असणें । ठाये ठावो ॥ ४-३७ ॥
 ३७
तैसे तया ठायी
असणे नसणे 
ऐसे हे कल्पने 
व्यर्थ असे ६९

संपूर्ण ही वस्तू 
भा व भावातीत 
आपल्यात स्थित
स्वयमेव ॥७०


निर्मळपणीं आपुळा । आकाशाचा संचु विराला ।
तो स्वयें असे पुढिला । कांहीं ना कीं ॥ ४-३८ ॥
 ३८
आकाशी आकाशी 
असे भरलेले 
सर्वत्र साठले 
निर्मळत्वे ७१

वस्तूने भरले 
दिसे बिघडले 
तयात संचले
असेच की


कां आंगीं कीं निर्मळपणीं । हारपलिया पोखरणीं ।
हें आणिकावांचूनि पाणी । सगळेंचि आहे ॥ ४-३९ ॥
 ३९
निर्मळ ते पाणी 
वाहे झऱ्यातून 
जाताच आटून
नच दिसे ७३

परंतु भुमिच्या
खाली अंतरात 
असते वाहत 
झुळू झुळू ७४


आपणा भागु तैसें । असणेंचि जें असे ।
आहे नाहीं ऐसें । सांडोनिया ॥ ४-४० ॥ 
४०
स्वतःच्या ठिकाणी 
आहे नाही पण 
असते टाकून 
आत्मतत्त्व ७५

 
 

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
  https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...