अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ४ ज् ज्ञानाज्ञानभेदकथन ओव्या ४१ रे ४३ (अभंग ७६ ते८२ ) ****************************************************************************
निदेचें नाहींपण । निमालियाहि
जागेंपण ।
असिजे कां नेण । कोणी न होऊनि
जैसें ॥ ४-४१ ॥
४१
सरुनिया निद्रा येता जागेपण
तयाचे स्मरण
कोण ठेवी ॥ ७६ ॥
जागृती चे भान
असे क्षण क्षण
सहज व्यापून
अस्तित्वाला ॥ ७७ ॥
कां भूमि कुंभ ठेविजे । तैं
सकुंभता आपजे ।
तो नेलियां म्हणिजे । तेणेंविण ॥
४-४२ ॥
४२
जया भूमीवर
ठेवी यला कुंभ
तियेस सकुंभ
म्हणविते ॥ ७८ ॥
नेताच तो कुंभ
परी तो तेथून
भूमी कुंभाविन
म्हणतात ॥ ७९ ॥
परी दोन्ही हे भाग । न शिवति
भूमीचें आंग ।
ते वेळीं भूमि तैसें चांग । चोख
जें असणें ॥ ४-४३ ॥
४३
ठेवणे आणिक
कुंभ उचलणे
क्रियेचे घडणे
झाले नाही ॥ ८० ॥
तरी त्या भूमीस
का घट सहित
वा घट रहित
म्हणतात ? ॥ ८१ ॥
तद्वत आत्मा
आहे नाही विन
केवळ असून
राही येथे. ॥ ८२ ॥
॥इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्अमृतानुभवे ज्ञानाज्ञानभेदकथनं नाम चतुर्थ प्रकरणं संपूर्णम् ॥
© डॉ.विक्रांत
प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
No comments:
Post a Comment