तैसें अनुभाव्य अनुभाविक । इहीं दोही अनुभूतिक । तें गेलिया कैचें एक । एकासिचि ॥ ५-६१॥
जैसा अनुभाव्य
नि अनुभविता
अनुभवी सदा
असतात ॥११८
परी आत्मस्थिती
अभाव ययाला
संबंध तयाला
मग कुठे॥११९
अनुभवो हा ठाववरी । आपुलीचि अवसरी । तेथें अक्षरांची हारी । वाईल काई ? ॥ ५-६२ ॥
जातसे जिरून
ठाईच विरून
आपुलिया ॥१२०
तर मग तेथे
शब्दांनी वर्णन
कैसे हे घडून
सांगा बरे ॥१२१
कां परेसी पडे मिठी । तेथें नादासाळु नुठी । मा वावरिजैल ओंठीं । हें कें आहे ? ॥ ५-६३ ॥
अहो तिथे परा
विलय पावते
नादा न मिळते
जागा काही ॥१२२
तर मग ओठी
येईल बोलता
काय रे हे घेता
होत आहे ॥१२३
६४
चेइलियाही पाठीं । चेवणयाच्या गोठी । कां धाला बैसें पाठीं । रंधनाच्या ? ॥ ५-६४ ॥
जागे करण्याच्या
गोष्टी त्या कामाच्या
नाही जशा ॥१२४
जेवून उठला
समाधानी झाला
का पुन्हा पाकाला
लागे सांगा ॥१२५
६५
उदैजलिया दिवसपती । तैं कीं दिवे सेजे येती । वांचुनि पिकला शेतीं । सुइजताती नांगर काई ? ॥ ५-६५ ॥
उगवता दिन
दिवे मालवती
तयाला लावती
कोण पुन्हा ॥१२६
पिकुनिया शेती
धान्य आले हाती
तया नांगरती
काय कोणी॥१२७
६६
तयाला लावती
कोण पुन्हा ॥१२६
पिकुनिया शेती
धान्य आले हाती
तया नांगरती
काय कोणी॥१२७
६६
म्हणोनि बंधमोक्षाचें व्याज । नाहीं ; निमालें काज ।आतां निरूपणाचें भोज । वोळगे जर्ही ॥ ५-६६ ॥
बंध मोक्षाचे ते
जरी नाही काम
घडला विराम
तया जरी ॥१२८
तरी निरूपण
घडे कौतुकाने
काही मिळवणे
नसे तया ॥१२९
६७
आणि पुढिला कां आपणापें । वस्तु विसराचेनि हातें हारपें । मग शब्देंचि घेपे । आठवूनियां ॥ ५-६७ ॥
कधी पुढीलांना
वा आपल्याला
विसर पडला
स्वरूपाचा ॥१३०
शब्दचि तयाची
करी आठवण
तेच प्रयोजन
असे त्याचे ॥१३१
६८
येतुलियाहि परौतें । चांगावें नाहीं शब्दातें । जर्ही स्मारकपणें कीर्तीतें । मिरवी हा जगीं ॥ ५-६८ ॥ ॥
स्वरूपाची स्मृती
करुनिया देती
जगी मिरवती
शब्द जरी ॥१३२
परी तेवढीच
तयांची ती शक्ती
मोठेपणा मिती
आण नाही.॥१३३
स्वरूपाची स्मृती
करुनिया देती
जगी मिरवती
शब्द जरी ॥१३२
परी तेवढीच
तयांची ती शक्ती
मोठेपणा मिती
आण नाही.॥१३३
इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्अमृतानुभवे सच्चिदानंदपदत्रयविवरणं नाम पंचम प्रकरणं संपूर्णम् ॥
पद्यानुवादक
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
No comments:
Post a Comment