अमृतानुभव, पद्य भावानुवाद अध्याय २, सद्गुरू स्तवन, ओव्या ६१ ते ६५
*******************************************************************
म्हणौनि शिष्य आणि गुरुनाथु । या दोहों शब्दांचा अर्थु ।
श्रीगुरुचि परी होतु । दोहों ठायीं ॥ २-६१ ॥
६१
म्हणोनिया शिष्य
आणि गुरुनाथ
दोघांचाही अर्थ
गुरुनाथ ॥ १३६ ॥
जरी का भिन्नशी
जगाला दिसती
गुरूची असती
दोन्ही ठायी ॥ १३७ ॥
कां सुवर्ण आणि लेणें । वसतें येकें सुवर्णें ।
वसतें चंद्र चांदणें । चंद्रींचि जेवीं ॥ २-६२ ॥
६२
सुवर्ण लेण्यात
केवळ सुवर्ण
असते भरून
ओत प्रोत ॥ १३८ ॥
किंवा चांदण्यात
चंद्रमा केवळ
भरला सुंदर
दिसतोच ॥ १३९ ॥
नाना कापुरु आणि परिमळु । कापुरचि केवळु ।
गोडी आणि गुळु । गुळुचि जेवीं ॥ २-६३ ॥
६३
जैसा की कापूर
अन् परिमळ
कापूर केवळ
असे देखा ॥ १४० ॥
गुणांची जी गोडी
गुळची साचार
चवीस आकार
अन्य नाही ॥ १४१ ॥
इतैसा गुरुशिष्यमिसें । हाचि येकु उल्हासे ।
जर्ही कांहीं दिसे । दोन्ही-पणें ॥ २-६४ ॥
६४
ऐशिया परी हा
गुरू शिष्यमिशे
गुरूची विलासे
जगामाजी ॥ १४२ ॥
जरि दोन दिसे
भिन्न ऐसे भासे
एकत्वी उल्हासे
नटलेले ॥ १४३ ॥
आरिसा आणि मुखीं । मी दिसे हे उखी ।
आपुलिये ओळखी । जाणे मुख ॥ २-६५ ॥
६५
आरशात मुख
आपले पाहून
घेतले जाणून
असा की मी ॥ १४४ ॥
जरी प्रतिबिंब
असतो आभास
आप आपणास
कळो येई ॥ १४५॥
© डॉ.विक्रांत प्रभाकर
तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com/
No comments:
Post a Comment