Saturday, 14 March 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय४, ज्ञान अज्ञान भेद कथन ओव्या ११ ते १५ (अभंग २१ ते३० )





अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय४, ज्ञान अज्ञान भेद कथन  ओव्या ११ ते १५ (अभंग २१  ते३० )
 *************************************************************************
 १ १

जैसें कल्पांतीचें भरितें । स्थळाजळा दोहींतें ।

बुडविलिया आरौतें । राहोंचि नेणें ॥ ४-११ ॥
 

कल्पांतीचे जळ
व्यापते सकळ
स्थळ आणि जळ
आधीचेही

पाण्याहून काही
प्र्कृति वेगळी
आणिक निराळी 
नुरे तिथे  २२

 १२
कीं विश्वाहि वेगळ । वाढे जैं सूर्यमंडळ ।

तैं तेज तम निखळ । तेंचि होय ॥ ४-१२ ॥

व्यापून सूर्याला 
वाढे सूर्य मंडळ 
त्याविना वेगळ
 नुरे काही २३

गिळूनी तमाला 
आणि प्रकाशाला 
आदित्य उरला 
तैसे होय २४

 १३
नाना नीद मारोनि । आपणपें हिरौनि ।

जागणें ठाके होवोनि । जागणेंचि ॥ ४-१३ ॥

सरताच निद्रा 
तिची आठवण 
जातो विसरून 
निजलेला २५

आठवे वाचून 
नित्य जागेपण 
राहिले वेटाळून 
मग त्याला २६


तैसे अज्ञान आटोनियां । ज्ञान येतें उवाया ।

ज्ञानाज्ञान गिळुनियां । ज्ञानचि होय ॥ ४-१४ ॥
१४
पैसे अज्ञानाला
बाजूला सारून 
येत असे ज्ञान 
उदयाला २७

अज्ञान रुपीच 
असे हे जे ज्ञान 
तया ही जुळून 
ज्ञान राही २१

निश्चळ ज्ञानाची 
जाणते जाणून 
असे ही खूण
होती सारी २८
१५

ते वेळीं पुनिवां भरे । ना अवसां सरे ।
ते चंद्रींचि उरे । सतरावी जैशी ॥ ४-१५ ॥
सतरावी  कला 
सदैव चंद्राला 
परी दृष्टीला 
दिसे भिन्न २९

 पुनव संपूर्ण 
अवसेला शून्य 
चंद्राचे  दर्शन 
भासे जरी३०

 
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
  https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...