Monday 9 March 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ४ ज् ज्ञानाज्ञानभेदकथन ओव्या १ रे ५ (अभंग १ते १० )







ज्ञानाज्ञानभेदकथन

(ज्ञान अज्ञान भेद कथन)


आतां अज्ञानाचेनि मारें । ज्ञान अभेदें वावरें ।
नीद साधोनि जागरें । नांदिजे जेवीं ॥ ४-१ ॥
 
  १

सरलिया निद्रा
जागृतीच उरे 
आठवणही नुरे 
जेवी तिची

तैसा अज्ञानाला 
मारुनिया ज्ञान 
राहते नांदुन
एकत्वाने 
२ 


कां दर्पणाचा निघाला । ऐक्यबोधु पहिला ।
मुख भोगी आपुला । आपणचि ॥ ४-२ ॥
 
जैसे दर्पणात 
पाहुनिया मुख 
कळते कौतुक 
आपलेच 

वेगळेपणाने 
भासते ते  मुख 
मी पणाचे सुख 
तरी तेथे 
 ३ 


ज्ञान जिया तिया परी । जगीं आत्मैक्य करी ।
तैं सुरिया खोचे सुरी । तैसें जालें ॥ ४-३ ॥
 
घडते ज्ञानाने 
म्हणे आत्म ऐक्य 
अवघे अशक्य 
बोल आहे 

सुरीला सुरीने
खोचावे  त्वेषाने 
तैसे हे बोलणे 
घडे जणू 
 ४


लावी आंत ठावूनि कोपट । तो साधी आपणया सकट ।
का बांधलया चोरट । मोटेमाजी ॥ ४-४ ॥
 
करुनिया कोष
सभोवती किट 
स्वतः घे संकट 
ओढवून  ॥७

चोरल्या धनाची 
बांधुनिया मोट 
लपुनी तयात 
चोर राही  ॥८
 ५

आगी पोतासाचेनि मिसें । आपणपें जाळिलें जैसें ।
ज्ञाना अज्ञाननाशें । तैसें जालें ॥ ४-५ ॥
कापूरा जाळण्या
निघालासे अग्नी 
जाय हरवूनी
तया सवे  ॥९

तैसा अज्ञानाचा
नाश करू जाय 
ज्ञानही विलय 
होत असे १०


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

 https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...