अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ४ ज्ञानाज्ञानभेदकथन ओव्या २६ रे ३० (अभंग५१ ते५७ )
-----------------------------------------------------------------------------------------------------
तरी कांहीं नाहीं सर्वथा । ऐसी
जरी व्यवस्था ।
तरी नाहीं हे प्रथा । कवणासि पां ? ॥ ४-२६ ॥
२६
जरी काही नाही
ऐसी ही अवस्था
कळते सर्वथा
कुणाला ते॥५१॥
शून्यसिद्धांतबोधु । कोणे सत्ता
होये सिद्धु ? ।
नसता हा अपवादु । वस्तूसी जो ॥
४-२७ ॥
2७
जेणे होय बोध शून्य सिद्धांताचा
कोणत्या सत्तेचा
हात तिथे ॥५२ ॥
नसणे पणाचा
आरोप वस्तूला
पाहता कळला
नीट पणे ॥५३॥
माल्हवितां देवे । माल्हवितें जरी
माल्हवे ।
तरी दीपु नाहीं हें फावे । कोणासि
पां ॥ ४-२८ ॥
2८मालवून दिवा
मालविता मरे
तरी कुणा कळे
दीप नाही ॥५४॥
कीं निदेचेनि आलेंपणें । निदेलें
तें जाय प्राणें ।
तरी नीद भली हें कोणें । जाणिजेल
पां ? ॥ ४-२९ ॥
2९निद्रा भली होती
कळेल कुणाला
निद्रेतच गेला
प्राण जर ॥५५॥
घटु घटपणें भासे । तद्भंगें भंगू
आभासे ।
सर्वथा नाहीं तैं नसे । कोणें
म्हणावें ? ॥ ४-३० ॥ ३०घट पणे घट
तुटता ही घट
भासतसे घट
पाहणाऱ्या ॥५६॥
आणि घट तोच
सर्वथा ही नाही
ऐसा कोण पाही
अभाव हा ॥५७॥
© डॉ.विक्रांत
प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
No comments:
Post a Comment