Wednesday 26 February 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ३, वाचा ऋण परिहार ओव्या ३१ ते ३३ (अध्याय ३संपुर्ण )

 



अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ३, वाचा ऋण परिहार ओव्या ३१ ते ३३ संपुर्ण


३१


तैसें ग्रासूनि दुसरें । स्वरूपीं स्वरूपाकारें ।

आपुलेपणें उरे । बोधु जो कां ॥ ३-३१ ॥
 

द्वैताची सांडणी
करुनी स्वरूप
राहिले स्वरूप
होऊनिया६५
स्वरुपाचा बोध
उरे जो अंतरी
अद्वैताच्या घरी
नांदणारा६६ 


तें ऋणशेष वाचा इया । न फेडवेचि मरोनियां ।

तें पायां पडोनि मियां । सोडविलें ॥ ३-३२ ॥
तेच ते हे असे
चारी वाचा ऋण
अगदी मरून
फेडवेना६७
भजता चरण
गुरूंचे पावन
जातसे फिटून
आपोआप ६८
३३


म्हणोनि परा पश्यंती । मध्यमा हन भारती ।
या निस्तरलिया लागती । ज्ञानीं अज्ञानींचि ॥ ३-३३ ॥
 म्हणूनिया परा
पश्यंती वैखरी
मध्यमादि चारी
वाचा ऋण६९
घ्यावीत फेडून
जाण्या ओलांडून
ज्ञान नि विज्ञान
सर्वथैव ७०
तिचे निस्तरण
न ये चि घडून
कृपेच्या वाचून
गुरुचिया ७१

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 https://amrutaanubhav.blogspot.com/

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...