अमृतानुभव, पद्य भावानुवाद अध्याय २, सद्गुरू स्तवन, ओव्या ७६ ते ८०
दिठी मुखाचिये बरवे । पाथीकडोनि जैं
पावे ।
तैं आरिसे धांडोलावे । लागती काई ? ॥
२-७६ ॥
७६मुखावर दिसे
बरवी ती दिठी
जरी काय पाठी
असती तो..... ॥१६७॥
आरसे शोधून
पाहावे आणून
येते का घडून
सांगा पाहू ? ॥१६८॥
कीं राती हन गेलिया । दिवस हन पातलिया ।
काय सूर्यपण सूर्या । होआवें लागें ? ॥ २-७७ ॥
७७
हरविता राती
उगविता दिन
सूर्या सूर्य पण
घेणे लागे ?॥१६९॥
अहो ते तयाचे
होणेच की आहे
घडणे हे पाहे
रात्रंदिन ॥१७०॥
म्हणोनि बोध्य बोधोनि । घेपे प्रमाणें साधोनि ।
ऐसा नव्हे भरंवसेनि । गोसावी हा ॥ २-७८ ॥
७८
असा हा म्हणुनि
बोधाने बोधून
प्रमाण जाणून
कळो न ये ॥१७१॥
स्वयं सदा सिद्ध
आधारा वाचून
आकारी दिसून
महाराव ॥१७२॥
ऐसें करणियावीण । स्वयंभचि जें निवृत्तिपण ।
तयाचे श्रीचरण । वंदिले ऐसे ॥ २-७९ ॥
७९
ऐसी जया ठायी
निवृत्ती वसली
स्वयंभ आपुली
केल्याविन ॥१७३॥
वंदितो परम
त्यांचे चरण
भाग्याचे कारण
अवघ्या जो ॥१७४॥
आतां ज्ञानदेवो म्हणे । श्रीगुरु प्रणामें येणें ।
फेडिली वाचाऋणें । चौही वाचांचीं ॥ २-८० ॥ ॥
८०
वैखरी मध्यमा
परा पशंतीचे
ऋण होते साचे
मजवरी ॥१७५॥
म्हणे ज्ञानदेव
टाकले फेडून
करून वंदना
गुरूदेवे ॥१७६॥
(ऐसे हे करून श्री गुरू वंदन फेडियले ऋण चारी वाचा )
इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्अमृतानुभवे गुरुस्तवनम् नाम द्वितीय प्रकरणं संपूर्णम् ॥
© डॉ.विक्रांत प्रभाकर
तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com/
No comments:
Post a Comment