Wednesday, 19 February 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ३, वाचा ऋण परिहार ओव्या १६ ते २०





अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ३, वाचा ऋण परिहार ओव्या १६  ते २०
********************************************************

आणि ज्ञान बंधु ऐसें । शिवसूत्राचेनि मिसें ।
म्हणीतलें असे । सदाशिवें ॥ ३-१
१६
ज्ञान हाही बंध
असे एक खरा
सांगे शिवसूत्रा
सदाशिव  ३३
आणि वैकुंठींचेहि सुजाणें । ज्ञानपाशीं सत्त्वगुणें ।
बांधिजे हें बोलणें । बहू केलें ॥ ३-१७ ॥

वैकुंठीचा राणा
श्रीविष्णू सुजान
गेलासे सांगून
हेच तत्व ३४

जीव सत्व गुणे
ज्ञाना पाशी बद्ध
बोलणे विस्तृत
तया केले ।।३५।।
परि शिवें कां श्रीवल्लभें । बोलिलें येणेंचि लोभें ।
मानू तेही लाभे । न बोलतांही ॥ ३-१८ ॥

१८
बोलले श्रीशिव
विष्णु भगवान
म्हणुनी प्रमाण
नाही फक्त ।।३६ ।।

घेऊनिया स्वये
तोच अनुभव
शब्दी सावयव
मांडियला ३७

जें आत्मज्ञान निखळ । तेंहि घे ज्ञानाचें बळ ।
तैं सूर्य चिंती सबळ । तैसे नोव्हे ? ॥ ३-१९ ॥

सदा आत्मतत्व
स्वयंभू सबळ
तया ज्ञान बळ
लागेचिना ३८

काय कधी मागे
भास्कर  आधार
येण्या प्राचीवर
उदयाला ३९

ज्ञानें श्लाघ्यतु आले । तैं ज्ञानपण धाडिलें वांये ।
दीपवांचून दिवा न लाहे । तैं आंग भुललाचि कीं ॥ ३-२० ॥
२०
ज्ञाने मोठेपण
घेई जेव्हा ज्ञान
वाया गेले ज्ञान
म्हणावे ते ४०

जाय पाहण्यास
घेऊन दीपक
आपण दीपक
असूनही ४१

त्यांचे ते करणे
स्वतः विसरणे
गुणधर्म नेणे
आपुलाची ४२

*****

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 http://amrutanubhav.blogspot.in

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...