Saturday, 22 February 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ३, वाचा ऋण परिहार ओव्या २१ ते २५


  

 

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ३, वाचा ऋण परिहार ओव्या २१ ते २

*****************************************************************************************


आपणचि आपणापाशीं । नेणतां देशोदेशीं ।
आपणपें गिंवशी । हें कीरु होय ? ॥ ३-२१ ॥
२१
अरे हरवलो 
मी तो म्हणुनिया
शोधण्यास कोणी
जात असे ४३
शोधाच्या प्रयासी
फिरे देशोदेशी
काय आपणासी
सापडे का ४४

परि बहुतां कां दिया । आपणपें आठवलिया ।
म्हणे मी यया । कैसा रिझों ? ॥ ३-२२ ॥

बहु दिवसांनी
त्याच आठवले
आपण आपले
आहोतची ४५
तरी तया हर्ष
मानवा का कुणी
माने तया मनी
भ्रम तोचि ४६

तैसा ज्ञानरूप आत्मा । द्नानेंचि आपली प्रमा ।
करीतसे सोहं मा । ऐसा बंधु ॥ ३-२३ ॥

आत्मा ज्ञानरूप
स्वयंभू असून
तेथील प्रमाण
ज्ञान हे ची ४७
परी ज्ञानाधारे
सोहम सोहम ऐसे
वदने ही असे
बंध तोही ४८

जोवरी अहम
तोवरी बंधन
सत्वाचे घेऊन
पांघरून ४९

निखळ ज्ञान ते
सोहम गिळून
राहते असून
असल्यात ५०

जें ज्ञान स्वयें बुडे । म्हणोनि भारी नावडे ।
ज्ञानें मोक्षु घडे । तें निमालेनि ॥ ३-२४ ॥

अज्ञान सारते
ज्ञान स्वयम् बुडे
तरी तेची घडे
प्रकटन ५१
ज्ञाने मोक्ष इथे
जरी सत्य म्हणे
परी निमाल्याने
तेची जेव्हा ५२

म्हणोनि परादिका वाचा । तो शृंगारु चौ अंगांचा ।
एवं अविद्या जीवाचा । जीवत्व त्यागी ॥ ३-२५ ॥

म्हणोनिया चारी
वाचेचा शृंगार
चारी देहावर
विराजतो ५३
अविद्या जीवाची
अवघी ही सारी
जीवा सवे सरी
आपोआप ५४

***********************
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 https://amrutaanubhav.blogspot.com/

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...