Friday 14 February 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ३, वाचा ऋण परिहार ओव्या ११ ते १५



अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ३, वाचा ऋण परिहार ओव्या ११  ते १५
********************************************************


परि जीती ना मेली । अविद्या हे जाकळी ।

बन्धमोक्षीं घाली । बांधोनियां ॥ ३-११ ॥
 
जिवंत वा मेली
अविद्या ही बळी
जीवाला झकोळी
सर्वकाळ ॥२१॥
घाली बंधनात
दावी मुक्तावस्था
आधार सर्वथा
परि तिचा ॥२२


मोक्षुचि बंधु होये । तरी मोक्ष शब्द कां साहे ?

अज्ञान घरी त्राये । वा‍उगीची ॥ ३-१२ ॥

मोक्षची बंधन
जर असे येथे
मोक्ष शब्द तिथे 
साहावे का ॥२३॥

अज्ञानाच्या घरा
यया थोरपण
वाचलो आपण
असे वाटे ॥२४॥

बागुलाचेनि मरणें । तोषावें कीं बाळपणें ।
येरा तो नाहीं मा कोणें । मृत्यु मानावा ? ॥ ३-१३ ॥
 
बागुलबुवा ला
घडले मरणे
ऐसिया श्रवणे
बाळानंद ॥२५॥
परी तो थोरांना
पडेना फरक
शब्द तो भ्रामक
असल्याने ॥२६॥



घटाचें नाहींपण । फुटलियाची नागवण ।

मानीत असे ते जाण । म्हणो ये की ॥ ३-१४ ॥
 
नसलेला घट
जाताच फुटून
कुणा नुकसान
झाले असे ॥२७॥
हे खरे मानती
तयास शहाणी
म्हणावे ते कुणी
मग येथे ॥२८॥

म्हणोनि बंधुचि तंव वावो । मा मोक्षा कें प्रसवो ?
मरोनि केला ठावो । अविद्या तया ॥ ३-१५ ॥
बंध जर खोटा
मोक्ष कैसा खरा
अवघा पसारा
अविद्येचा ॥२९ ॥

तिये अविदयेने  
मरूनिया स्वये
केली मोक्ष श्रीये 
जागा जगी ॥३०॥
(नसलेला बंध
सुटुन या गेला 
म्हणावे सुटला 
कुणी इथे ) ॥३१॥



*****
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 http://amrutanubhav.blogspot.in

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...