अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ३, वाचा ऋण परिहार ओव्या ६ ते १०
**********************************************************************
लवण अंगें विरे । परी स्वादें
जळीं उरे ।
नीद मरोनि जागरें । जिइजे
निदें ॥ ३-६ ॥
लवण पाण्यात जरी विरघळे
परी स्वाद कळे
रसनेस ॥११॥
येता जागृतीत
दिसे निद्रा अंत
सूक्ष्म ती रूपात
राही परी ॥१२॥
तेवीं अविद्येसवें । चौघीं
वेंचती जीवें ।
तत्त्वज्ञानाचेनि नांवे ।
उठतीचि या ॥ ३-७ ॥
तैश्या चारी वाणी
अवैद्ये सोबत
निघून जातात
वाटे ऐसे ॥१३॥
परी तत्वज्ञान
नाव पांघरून
होती ती अवतीर्ण
पुन्हा येथे ॥१४॥
हा तत्त्वज्ञान दिवा । मरोनि
इहीं लावावा ।
तरी हाही शिणलेवा ।
बोधरूपेंची ॥ ३-८ ॥
आपण मरून
दिप तत्वज्ञान
लावियला ॥१५॥
परी मुक्त बोधा
घडे तो ही शिण
उपाधी लेवून
छान जरी ॥१६ ॥
येऊनि स्वप्न मेळवी । गेलिया
आपणपां दावी ।
दोन्ही दिठी नांदवी । नीद
जैशी ॥ ३-९ ॥
येताच ती निद्रा
आणिक जागता
जाग जैसी॥१७॥
स्वप्न जागृतीस
स्वप्नच कारक
आणि दर्शक
दशाचि या ॥१८॥
जिती अविद्या ऐसी । अन्यथा
बोधातें गिंवसी ।
तेचि यथा बोधेंसी । निमाली
उठी ॥ ३-१० ॥ तैसी ही अविद्या
अज्ञान पांघरी
इया जीवावरी
अस्तित्वाने ॥१९॥
आणि निमताच
बोधाची उजरी
करते अंतरी
तीच तेव्हा ॥२०॥
***********************
©
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com/
No comments:
Post a Comment