जियें सदैवेंचिया लीळा । दाखविला ॥३१॥
एकलेपणाच्या
सारून दुष्काळा
अनंत सोहळा
मिरविला ॥65 ॥
सुदैवपणाच्या
दाऊनिया लीला
आणीले रूपाला
जगता या ॥66 ॥
आंगाचिया आटणीया । कांत उवाया आणिया जिया ।
स्वसंकोचें प्रिया । रूढविली जेणें ॥३२॥
कष्टवून अंगा
शक्तीने शिवाला
बळाचा दिधला
आधार की.॥67 ॥
मग त्या शिवाने
स्वयें संकोचून
प्रिये मोठेपण
जगी दिले ॥68 ॥
जियेंते पहावयाचिया लोभा । चढे द्रष्टृत्वाचिया क्षोभा ।
जियेतें देखत उभा । आंगचि सांडी ॥३३॥
तिला पाहण्याचा
लोभधरी मना
दृष्टत्वाची धारणा
धरे तोही॥69 ॥
असे अंगभूत
सदा ती तयात
म्हणूनी दिसत
नाही कधी॥70 ॥
कांतेचिया भिडा । आवरला होय जगायेवढा ।
आंगवला उघडा । जियेवीण ॥३४॥
कांतेच्या भिडे
पती जग होय
नटूनिया जाय
विविधसा॥71 ॥
परि तिये विन
अंगा हरवून
उपाधी हरून
नाही होय॥72 ॥
जो हा ठाववेर्ही मंदरूपें । उवायिलेपणें हारपे ।
तो जाला जियेचेनि पडपें । विश्वरूप ॥३५॥
नसता ते दृश्य
दृष्ठत्व विरत
जाई हरवत
पुन्हा शुन्यी ॥73 ॥
असा हा जो सूक्ष्म
विस्तारे हरपे
होय विश्व रुपे
जियेमुळे ॥74 ॥
***
अमृतानुभव © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
https://amrutaanubhav.blogspot.com
https://dnyaneshwariabhyas.blogspot.com/
https://dnyaneshawarichintan.blogspot.com/
No comments:
Post a Comment