तेथ मी नमस्करा । लागीं उरों दुसरा ।
त-ही लिंगभेद पहा । जोडूं जावों ॥ १-५१ ॥
आणिक
येथे मी
करू
नमस्कारा
म्हणता दुसरा
होऊ
जाय ॥ 103॥
एकत्व
सांडून
प्रमाद
करून
कैसी
ये घडून
वंदना
ती ॥ 104॥
परि सोनेंनसिं दुजें । नव्हतु लेणें सोना भजे ।
हें नमन करणें माझें । तैसें आहे ॥ १-५२ ॥
सोन्याहून जैसे
लेणे
नव्हे भिन्न
तैसे
हे नमन
माझे
येथे॥ 105॥
सांगतां वाचेतें वाचा । ठाउ वाच्य वाचकाचा ।
पडतां काय भेदाचा । विटाळु होये ? ॥ १-५३ ॥
पडतां काय भेदाचा । विटाळु होये ? ॥ १-५३ ॥
वाणीने उच्चार
वाणी
या शब्दांचा
दिसतो भेदाचा
विटाळची॥ 106॥
शब्दात
हि वाणी
वाणीतही वाणी
भेदाची
कहाणी
नाही
तिथे॥ 107॥
सिंधु आणि गंगेचि मिळणी । स्त्रीपुरुष नामाची मिरवणी ।
दिसतसे तरी काय पाणी । द्वैत होईल ? ॥ १-५४ ॥
दिसतसे तरी काय पाणी । द्वैत होईल ? ॥ १-५४ ॥
सिंधूनी
गंगेचा
संगम
हा झाला
पाणीच
पाण्याला
मिळाले
ते ॥ 108॥
गंगा
सिंधू नाम
स्त्री
पुरुष वाचक
पाण्याला
बांधक
होतं
नाही॥ 109॥
पाहे पां भास्य भासकता । आपुला ठाईं दावितां ।
एकपण काय सविता । मोडितसे ? ॥ १-५५ ॥
एकपण काय सविता । मोडितसे ? ॥ १-५५ ॥
सूर्याच्या
प्रकाशी
सूर्याचे
दर्शन
दिसे
द्वैतपण
उजेडाचे ॥ 110 ॥
भास
भासकता
ययाची
एकता
पाहता
तत्त्वता
कळू
येते॥ 111॥
...............................................
No comments:
Post a Comment