अमृतानुभव अभ्यास
दर्पणाचेनि त्यागें । प्रतिबिंब बिंबीं रिगे ।
कां बुडी दिजे तरंगें । वायूचा ठेला ॥ १-६१॥
बिंब
प्रतिबिंबि
राहते
येऊन
त्यागिता
दर्पण
आपोआप ॥ 121॥
थांबताच
वायु
लहरी
नर्तन
होतात
विलीन
पाणीयात ॥ 122॥
नातरी नीदजातखेवों । पावे आपुला ठावो ।
तैशी बुद्धित्यागें देवीदेवो । वंदिली मिया ॥ १-६२ ॥
सरताच
नीद
आपुलाच
ठाव
कळू
येई भाव
आपुल्यात ॥ 123॥
तैसा
बुद्धी त्याग्ये
उपाधी
सरता
जहालो
वंदिता
देवी
देव ॥ 124॥
सांडूनि मीठपणाचा लोभु । मीठें सिंधुत्वाचा घेतला लाभु ।
तेविं अहं देऊनि शंभु । शांभवी झालों ॥ १-६३ ॥
सांडूनिया
मीठ
पणाचा
तो लोभ
घेतला
हा लाभ
सिद्धत्वाचा ॥ 125॥
असे
इथे केले
अहं
म्या त्यागिले
स्वरूप
पातले
शिव
शक्ती ॥ 126॥
शिवशक्तिसमावेशें । नमन केलें म्यां ऐसें ।
रंभागर्भ आकाशें । रिगाला जैसा । १-६४ ॥
शिवशक्ती
मध्ये
पूर्ण
सामावलो
एकरूप
झालो
नमोनिया ॥ 127॥
केळी
रोपट्याने
सर्वस्व
त्यागिले
आकाश
ते झाले
रिघोनिया॥ 128॥
******
॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्अमृतानुभवे
शिवशक्तिसमावेशनं नाम प्रथम प्रकरणं संपूर्णम् ॥
No comments:
Post a Comment