Tuesday 15 June 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २७६ते २८० (अभंग ५९३ ते६०३ )


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २७६ते २८० (अभंग ५९३ ते६०३  ) 
💮💮💮💮

लाखेचे मांदुसे । आगीचें ठेवणें कायिसें ? । आंतु बाहेरी सरिसें । करून घाली ॥ ७-२७६ ॥


लाखेच्या पेटीला 

आगीत ठेवणे 

आगिस  ठेवले 

तिच्यात वा ॥५९३

अंतर्बाह्य ची ती 

आगची होऊन 

जातसे जळून 

क्षणार्धात॥५९४

म्हणोनि जग ज्ञानें स्फितें । बोलतां अज्ञानवादातें । विखुरली होती आतें । वाचेचिये ॥ ७-२७७ ॥


अवघे जग हे 

भरले ज्ञानाने 

तयास म्हणणे 

अज्ञान हे ॥५९५

ऐसे हे बोलणे 

व्यर्थ  चावळणे 

वाणीस फोडणे 

फाटे जणू॥५९६

आखरीं तंव गोवधु । पुधारां अनृतवादु । मा कैसा अज्ञानवादु । कीजे ज्ञानीं ? ॥ ७-२७८ ॥ 

केलीया वाचून 

गोवध बोलणे 

पापची घडणे 

खोटे बोली ॥५९७

तैसेची गोवध 

शब्द हा बोलून 

पाप ते अजून 

वर होय ॥५९८

ऐसिया ज्ञानास 

अज्ञान म्हणणे 

दोषची घडणे

होय इथे॥५९९


आणि अज्ञान म्हणणें । स्फुरत्से अर्थपणें । आतां हेंचि ज्ञान कोणे । मानिजे ना ? ॥ ७-२७९ ॥ 


आणिक अज्ञान 

जेधवा कळते 

ज्ञान ते असते 

नाही काय ॥६००

तरी मग होय 

असे आत्मज्ञान 

ऐसे हे मानून 

का न जावे॥६०१

असो हें आत्मराजें । आपणापें जेणें तेजें । आपणचि देखिजे । बहुये परी ॥ ७-२८० ॥ 


किंबहुना हा 

स्वये आत्मराज 

उजेडी स्वतेज 

पाहे स्वतः ॥६०२

अनंत रूपांनी 

नटला रंगला 

विलास जो केला 

स्वतः सवे॥६०३


🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

🏵🏵

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...