Wednesday 23 June 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २८६ते २९० (अभंग ६१६ ते६२५ )

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २८६ते २९० (अभंग ६१६ ते६२५ ) 
💮💮💮💮
क्षीराब्धीं काळकूट । हे एकी परीचे विकट । परी काळकूटीं चोखट । सुधा कैंची ? ॥ ७-२८६ ॥ 

क्षीरसागरात 
निघे काळकुट
विचित्र ही गोष्ट 
जरी आहे ॥६१६

परी काळकुटी 
येईल का अमृत 
सदा जे चोखट 
दैवी गुणे?॥६१७

ना ज्ञानी अज्ञान जालें । तें होतांचि अज्ञान गेलें । पुढती ज्ञान येकलें । अज्ञान नाहीं ॥ ७-२८७ ॥ 

अथवा अज्ञान 
आले ज्ञानातून 
येताच भरून 
गेले ठायी॥६१८

आणिक शेवटी 
अज्ञान सरले 
ज्ञानची उरले 
ऐसे होय॥६१९

म्हणौनि सूर्य सूर्याचि येवढा । चंद्र चंद्राचि सांगडा । ना दिपाचिया पडिपाडा । ऐसा दीपु ॥ ७-२८८ ॥ 

जैसी का उपमा 
सूर्याला सूर्याची 
चंद्राला चंद्राची 
तशीच गा ॥६२०

दिव्याच्या योग्यते 
दिव्याच्या वाचून 
आणि ते कोण 
असे इथे॥६२१

प्रकाश तो प्रकाश कीं । यासि न वचे घेईं चुकी । म्हणौनि जग असकी । वस्तुप्रभा ॥ ७-२८९ ॥ 

प्रकाशा सारखा 
प्रकाशच जगी 
चूक यात उगी 
नाही काही ॥६२२

म्हणूनिया जग 
नाव जे हे पाहे
वस्तू प्रभा आहे 
जाणावे ती॥६२३

विभाति यस्य भासा । सर्वमिदं हा ऐसा । श्रुति काय वायसा । ढेंकरू देती ॥ ७-२९० ॥

भासते जग हे 
जयाच्या प्रकाशे 
श्रुती सांगतसे 
आत्मतत्त्व ॥६२४

असा तिचा बोल 
प्रकट पहावा 
व्यर्थ तो म्हणावा 
ढेकरू का?॥६२५

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...