Saturday 12 June 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २६६ते २७० (अभंग ५७१ ते ५८१)

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २६६ते २७० (अभंग ५७१ ते ५८१) 
+++++

म्हणौनि इये आत्मलीळे । नाहीं आन कांटाळें । आतां ययाचिये तुळे । हाचि यया ॥ ७-२६६ ॥

म्हणूनिया इथे 

आत्म विलासाला 

नाही मोजायला 

तराजू तो ॥ ५७१


तयाची तुलना 

करावया जाणे 

तोची तो रे होणे 

तराजू ही ॥५७२

स्वप्रकाशाचा घांसीं । जेवितां बहु वेगेंसी ।वेंचेना परी कुसीं । वाखही न पडे ॥ ७-२६७ ॥ 


स्वयम् प्रकाशाचे 

घास बहु वेगी 

जरी घेत राही

आत्मतत्व ॥५७३


तरीही नाहीच 

संपत ते अन्न 

उदरभरण 

होतं नाही ॥५७४


अनंत अमाप  

आत्म्याचा प्रकाश 

तया विस्तारास 

अंत नाही॥५७५


ऐसा निरुपमापरी । आपुलिये विलासवरी ।आत्मा राणीव करी । आपुला ठाईं ॥ ७-२६८ ॥


तैसे आत्मतत्त्व 

निरुपम रिती 

अनुपम गती 

असे ठायी॥५७६


आणिक वैभव -

विलास सामग्री 

राज्य तेच करी 

स्वतः करी ॥५७७


तयातें म्हणिपें अज्ञान । तरी न्याया भरलें रान । आतां म्हणे तयाचें वचन । उपसावों आम्ही ॥ ७-२६९ ॥ 

आता यया लागी 

म्हणावे अज्ञान 

न्याया दिले रान 

म्हणावे गा  ॥५७८


करता रानात

हद्दपार न्याय 

अवघा अन्याय 

होवू जाय॥५७९


प्रकाशितें अज्ञान । ऐसें म्हणणें हन । तरी निधि दावितें अंजन । न म्हणिजे काई ? ॥ ७-२७० ॥


जर म्हणू जाल

अज्ञाना प्रकाश

ज्ञानाचा विलास

कधी तर ॥५८०


दावी जे अनंत 

भूमिगत धन 

काजळ म्हणून

 संभावणे॥५८१


🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

💮💮💮💮💮

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...