Sunday 20 June 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २८१ते २८५ (अभंग ६०४ ते६१५ )

  

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २८१ते २८५ (अभंग ६०४ ते६१५ ) 
💮💮💮💮

निर्वचितां जें झावळे । तेंचि कीं लाहे डोळे ? । डोळ्यापुढें मिळे । तेंचि तया ॥ ७-२८१ ॥ 

विचारा समोर 

जी नच  टिकते 

डोळीया काय ते 

दिसणार ॥६०४

समोर दिसते 

तीच जी पाहते 

डोळ्याची कार्य ते 

ऐसे आहे॥६०५


ऐसें जगज्ञान जें आहे । तें अज्ञान म्हणें मी वियें । येणें अनुमानें हों पाहे । आथी ऐसें ॥ ७-२८२ ॥

जितुके काही जे 

जगी असे ज्ञान 

म्हणती अज्ञान 

मीच वितो ॥६०६

इये अनुमाने 

वळून पाहता 

दिसते तत्वता 

अज्ञान हे॥६०७


तंव अज्ञान त्रिशुद्धि नाहीं । हें जगेंचि ठेविलें ठाई । जे धर्मधर्मित्वें कंहीं । ज्ञानाज्ञान असे ? ॥ ७-२८३ ॥ 

यया अनुमाना 

उमटे उत्तर 

नाही खरोखर 

अज्ञान रे ॥६०८


अवघे जग हे 

ज्ञानाने भरले 

रिते न उरले 

तया काही ॥६०९


म्हणुनिया ज्ञान 

आणिक अज्ञान 

तयात ते आण 

कैसे येई॥६१०

ज्ञान हे चोखट 

कशाही वाचून 

जडत्व अज्ञान 

नसे तिथे॥६११


कां जळां मोतीं वियें ? । राखोंडिया दीपु जिये ? । तरी ज्ञानधर्मु होये । अज्ञानाचा ॥ ७-२८४ ॥ 

जळास जन्माला 

घाले काय मोती 

राख पेटवती 

दिपास का ॥६१२

ज्ञान अज्ञानाचा

धर्म का होईल .

जर घडतील

अशा गोष्टी॥६१३


चंद्रमा निगती ज्वळा ? । आकाश आते शिळा ? । तरी अज्ञान उजळा । ज्ञानातें वमी ॥ ७-२८५ ॥

जर चंद्रातून 

निघतील ज्वाळा 

आकाशात शिळा 

निर्माण हो॥६१४

ज्ञान अज्ञानाशी

म्हणावे उपजे 

जरी का घडीजे

यया गोष्टी॥६१५

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

com

🏵🏵

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...