Tuesday 29 June 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ८वा ज्ञानखंडण ओव्या , ११ते १५ (अभंग२१ ते ३०) 💮💮💮💮💮💮

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ८वा ज्ञानखंडण ओव्या , ११ते १५ (अभंग२१ ते ३०) 
💮💮💮💮💮💮

राती म्हणोनि दिवे । पडती कीं लावावे । वांदुन सूर्यासवें । शिणणें होय ॥ ८-११ ॥ 

रात्र आहे तव
आणुनिया दिवे
घरात लावावे 
उजेडला ॥२१

पण उजाडता 
पुन्हा ते लावणे 
व्यर्थची शिणने 
आहे जसे॥२२


म्हणोन अज्ञान नाहीं । तेथेंचि गेलें ज्ञानही । आतां निमिषोन्मेषा दोहीं । ठेली वाट ॥ ८-१२ ॥ 

अज्ञाना सापेक्ष 
असते जे ज्ञान 
जाताच निघून 
दोन्ही नाही ॥२३

म्हणुनिया ज्ञान 
अणिक अज्ञान 
वाटा या दोन
नाही होती ॥२४


येर्हवीं तर्ही ज्ञान अज्ञानानें । दोहींचि अभिधानें । अर्थाचेनि आनानें । विप्लावलीं ॥ ८-१३ ॥ 

खरे पाहू जाता 
ज्ञान व अज्ञान 
अभिधान दोन 
असतात ॥२५

आणिक जाणता 
अर्थ तो खोलात
दोन्ही हरवत
नाही होती॥२६


जैसीं दंपत्यें परस्परे । तोडोनि पालटिलीं शिरें । तेथें पालटु ना पण सरे । दोहींचें जिणें ॥ ८-१४ ॥ 

जैसी की दंपती 
शिरची तोडली 
आणिक लावली 
परस्परा ॥२७

स्वरूप तयांची 
नच बदलली 
प्राणास मुकली 
फुकटचं॥२८

कां पाठी लाविला होये । तो दीपुचि वायां जाये । दिठी अंधरें पाहे । तैं तेचि वृथा ॥ ८-१५ ॥ 


जर का दीपक 
पाठीशी लावला 
वायाची तो गेला 
जसा काही॥२९

व्यर्थची दिठी ती 
जर का समोर 
तिच्या तो अंधार 
दिसतसे॥३०

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...