Wednesday 2 June 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २३६ते २४० (अभंग ५०८ते ५१६ )


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २३६ते २४० (अभंग ५०८ते ५१६ ) 

,🏵🏵🏵


लेणें आणि भांगारें । भांगारचि येक स्फुरे । कां जे येथें दुसरें । नाहींचि म्हणोनि ॥ ७-२३६ ॥ 

लेणे सुवर्णात 

एक ते सुवर्ण 

नांदते ते संपूर्ण 

होऊनिया ॥५०८॥

सुवर्णा वाचून 

तेथे न दुसरे 

दिसते काही रे 

शोधुनिया ॥५०९॥


जळ तरंगीं दोहीं । जळावांचूनि नाहीं । म्हणौनि आन कांहीं । नाहीं ना नोहे ॥ ७-२३७ ॥ 

तैसेची तरंग 

आणिक पाण्

पाणीया वाचून 

नसे काही  ॥५१०॥

जळ तरंगात 

शब्द हे वाचक 

अनिक फरक 

नाही काही ॥५११॥

हो कां घ्राणानुमेयो । येवो कां हातीं घेवो । लाभो कां दिठी पाहों । भलतैसा ॥ ७-२३८ ॥ 

जरी का सुगंध 

घेताना नाकाने 

मृदुल स्पर्शाने 

हाता कळे ॥५१२॥

अन उघडून 

पाहता दृष्टीने 

सुंदर असणे 

ज्याचे असे ॥५१३

परी कापुराच्या ठाईं । कापुरावांचूनि नाहीं । तैशा रीती भलतयाही । हाचि यया ॥ ७-२३९ ॥ 

तया कापूराच्या

ठाई काही आणि 

कापुरा वाचुनी 

नाही जरी ॥५१४॥

तैसे आत्म्या ठायी

कोणत्याही रिती 

प्रत्ययास येती 

आत्मा हेच ॥५१५॥

आतां दृश्यपणें दिसो । कीं द्रष्टा होऊनि असो । परी हां वांचूनि अतिसो । नाहीं येथें ॥ ७-२४० ॥ 

दिसो दृश्यपणे 

द्रष्टा वा होऊनी 

नसे या वाचुनी 

अन्य काही॥५१६॥


🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...