***********
तैसीं निरर्थकें जल्पें । होउनियां सपडपें । शोभती जैसें लेपे । रंगावरी ॥ ६-१०१ ॥तैसे शब्द इथे
होय निरर्थक
सवे सहाय्यक
तयाच्या ते॥ १९८॥
जैसी भिंतीवर
रंगवलेली चित्रे
बहुत विचित्रे
जीव नाही॥१९९॥
एवं शब्दैकजीवनें । बापुडीं ज्ञानें अज्ञानें । साचपणें वनें । चित्रींचीं जैसीं ॥ ६-१०२ ॥
शब्द हेच ज्याचे
असती जीवन
ज्ञान व अज्ञान
बापुडे ते ॥ २००॥
जितके खरे ते
चित्रातील वन
त्याचे खरे पण
तितकेच ॥२०१॥
या शब्दाचा निमाला । महाप्रळयो हो सरला । अभ्रासवें गेला । दुर्दिनु जैसा ॥ ६-१०३ ॥
शब्दांचा जेधवा
कल्लोळ निमाला
प्रलय थांबला
महा थोर ॥२०२
उगाच दाटल्या
मेघा ला घेऊन
जातसे निघून
दुर्दिन जै ॥२०३॥
पडल्यावाचून
उगाच दाटते
मळभ भरते
आकाशात ॥२०४॥
जाती ते निघून
सुंदर हो दिन
प्रकाश भरून
ओसंडतो ॥२०५॥
तैसे शब्दाधार
ज्ञान व अज्ञान
जाती हरवून
शब्दांसवे ॥२०६॥
॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्अमृतानुभवे शब्दखंडनं नाम षष्ठम प्रकरणं संपूर्णम् ॥
No comments:
Post a Comment